भीती एकट रहाण्याची नसते तर खंत असते आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला परिपूर्णपणे ओळखणारी व्यक्ती आता नाहीये जी आपल्या भावना अचूकपणे समजून घेईल .....नेमका अर्थ काढेल केवळ आपल्या नजरेतून आपल्या मनांत चाललेली वादळे ओळखेल .....हो ब्रम्हांडाशी एकरूप ही भावना नक्कीच येते ....मग तरीही खंत नेमकी कशाची उरते ?आणि कुणासाठी? त्याच्या साठी की आपल्यासाठी ? असुरक्षिततेपोटी ? की आपलं सुख हिरावल्या गेल्यापोटी ?की त्यारूपातला आपला जिवलग मित्र गेला म्हणून ?की एक अपूर्णत्व म्हणून ?की एक रितेपणा आला म्हणून ?की सवयीची बाब म्हणून ?नेमकी भावना काय आणि कशासाठी असते ?आणि आपण अगदी आनंदाने सामान्य जीवन जगत असतांना स्वीकारले असतांना मग काही आनंदाच्या क्षणी दुःख क्षणी आणि एकांतक्षणी का ती एक वेदनेची दुःख भावना काळीज आरपार चिरते ......हे सगळं अस का होत ?
आणि सगळं कळत असतानाही ....
Monday, 7 March 2016
सोनाली कुलकर्णी
07:45
0 Comments
सोनाली कुलकर्णी
07:23
0 Comments
आठवतंय का तुला...
आपलं एकांतात भेटणं ?
ओठ उमलत असताना...
पापण्यांचं मिटणं !
#Mandarcholkar
सोनाली कुलकर्णी
06:14
0 Comments
तुझी आठवण यायला
काहीच कारण नसतं....
पण... ती आली की
तुझी अनावर ओढ लावुन जाते...!
मी माझ्या वेड्या मनाला
सावरण्याचा असफल प्रयत्न करतो....
आणि ती पुन्हा पुन्हा तुझंच वेड लावुन जाते....!
#तिच्या_आठवणी
sager kale
Wednesday, 13 January 2016
सूर्य एका राशीतून दुस-या राशीत जाणे यालाच 'संक्रमण' म्हणतात. मकर राशीमध्ये सूर्य जाणे यालाच 'मकर संक्रमण ' असे म्हणतात. ज्या दिवशी सूर्य धन राशीतून मकर राशीमध्ये जातो त्या संक्रमणाच्या दिवशी दरवर्षी हिंदू लोक 'संक्रांत' हा सण साजरा करतात. हा सण पौष महिन्यात येतो. हिंदू लोकांचे सण हे चांद्रवर्षानुसार असल्याने सध्या वापरल्या जाणा-या इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हिंदूंचा सण हा दरवर्षी विशिष्ट तारखेलाच येईल असे नसते. याला एकमेव अपवाद म्हणजे संक्रांत. संक्रांत हा सण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या १४ तारखेलाच साजरा केला जातो. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो.
संक्रांतीच्या वेळी थंडी असते. त्यामुळे शरीराला जास्त उष्मांक देणारे तीळ व गूळ या पदार्थांना या दिवशी फार महत्त्व असते. सूर्याला व देवाला तिळगुळाचा नैवेद्य दाखविला जातो.सुवासिनी ह्या दिवशी सवाष्णीला सुगडाचा वसा देतात.
सुगड पूजन
सुगडाचा वसा म्हणजे लहान मडक्यांतून गव्हाच्या ओंब्या, गाजर व ऊस यांचे तुकडे, पावटयाच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, बोरे, हरब-याचे घाटे, तिळगुळाच्या वडया, हलवा असे पदार्थ घालून त्या मडक्यांना हळदीकुंकू लावून ती सुवासिनींना देतात. भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी आपल्या शेतात पिकविलेल्या भाज्या-धान्य वगैरे नमुन्यादाखल इतर शेतकऱ्यांना देऊन ,चांगल्या वाणाची चर्चा व्हावी व अधिक चांगले उत्पन्न देणा-या बियाणांविषयी देव-घेव व्हावी हा सुगडाच्या वशामागचा हेतू आहे.
संक्रांतीच्या सणाला ‘सुगड’ लागतात. सुगड म्हणजे छोटे मातीचे मडके. सुगडांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे (कांड्या), शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, हळदीकुंकू इत्यादी भरतात.रांगोळी घालून पाट मांडून त्यावर पाच सुगड ठेवतात. त्यांचे पूजन करतात. तीन सुगड सवाष्णींना दान (वाण) देतात, एक सुगड तुळशीला आणि एक स्वतः करिता ठेवतात.
संक्रांतीला जेवणात मिष्टान्न म्हणून गुळाची पोळी करतात. गुळाच्या पोळीबरोबर लोणकढे तूप वाढण्याची प्रथा आहे.
संक्रांतीच्यावेळी काळया वस्त्रांना महत्त्व दिले जाते कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळया साडया, काळी झबली अशी वस्त्रे संक्रांतीच्या सुमारास कापड बाजारात दिसू लागतात.
नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणा-या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळया रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. त्यांना हलव्याचे दागिने घालतात व सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावतात. त्यांना तिळगुळाच्या वडया किंवा तीळ आणि साखरेपासून बनविलेला हलवा देतात. निरांजन, स्टीलच्या लहान डब्या, पिशव्या वगैरेंसारखी एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला 'आवा लुटणे' असे म्हणतात.
सांस्कृतिकदृष्टया या सणाचे फार महत्त्व आहे. लोक एकमेकांना तिळगूळ देतात व 'तिळगुळ घ्या - गोड बोला' असे म्हणतात. आपली जुनी भांडणे-वैरे विसरून, पुन्हा स्नेहाचे, सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी ही मोठीच संधी असते. ज्यांचे संबंध चांगलेच आहेत, त्यांचे संबंध अधिक दृढ होण्यासाठी याचा उपयोग होतो.
'बोरनहाण'
संक्रांतीपासून ते रथसप्तमी या तिथीपर्यंत कोणत्याही दिवशी एक वर्षाच्या आतील लहान मुलांचे आणि मुलींचे 'बोरनहाण' केले जाते. यावेळी मुलांची हौस म्हणून त्यांना हलव्याचे दागिने करतात. काळे झबले शिवतात. चुरमुरे, बत्तासे, बोरे, हलवा, तिळाच्या रेवडया वगैरे पदार्थ एकत्र करून लहान बाळाला मधे बसवून त्यावर या खाऊच्या पदार्थांचा वर्षाव केला जातो. घरातील व जवळपासची लहानमुलेही या वेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात.
या सणानिमित्त शुभेच्छापत्रे पाठविण्याचीही पध्दत आहे.
पौष महिन्यात , हिंदूंच्या 'संक्रांत' या सणाच्या आदल्या दिवशी, म्हणजे १३ जानेवारीला भोगी हा सण दरवर्षी साजरा केला जातो.
भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पध्दत आहे. ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे-गाजर- हरभरे- वांगी या सर्वांची मिळून भाजी वगैरे. देवाची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवितात. या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिला तेल, शिकेकाईने नहावयास घालतात. जेवणानंतर विडा, दक्षिणा दिली जाते. घरातील सर्व स्त्रियाही ह्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात.
भोगी देणे - भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात.
Thursday, 23 April 2015
सतत आघात पेलणारा आणि सतत दु:खे सोसणारा…. एकतर खूप हळवा होतो किवा खूप कठोर….
जास्त हळवं असण योग्य नाहीच…. थोडतरी कठोर (strong) असावं….
तरीही कुणी एवढही कठोर नसाव की समोरचा अगदीच मोडून पडेल…
भावनांना मोकळी वाट दिली तर त्या अलगद डोळ्यावर येतात आणि नकळतच मन मोकळ होत…. याउलट त्यांना कोंडून ठेवलं तर त्या आतल्या आत घुसमटत राहतात आणि मनातच त्यांचा असा काही विस्फोट होतो की फक्त आक्रोशच उरतो….
कठोर माणसे एवढी कठोर असतात की हा आक्रोश सुद्धा ती डांबून ठेवतात…. जगासमोर येऊ देत नाहीत…. पण, पाहणाऱ्याला मात्र तो आक्रोश त्यांच्या थंड आणि शांत चेहऱ्यावरही ठळकपणे सुस्पष्ट दिसतो….
होय, जास्त हळवं असण योग्य नाहीच….तरीही कुणी एवढही कठोर नसावं की भावनांना महत्वच न उराव….
कधीतरी का होईना…. पण….आपल्यावर प्रेम करणाऱ्याच्या मिठीत स्व:तला झोकून द्याव…. आणि त्या भावनांना आणि यातनांना मोकळी वाट करून द्यावी….
पहा किती हलक वाटेल….
आणि त्या प्रेंम करण्याऱ्या समोरच्याच प्रेमही अगणित पटीने वाढेल….
- अमर ढेंबरे
(chitrakavita)
सर्दी खोकल्यावर रामबाण घरगुती ऊपाय
आधुनिक विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही, त्याला न जुमानता लोकांना सातत्याने सर्दी-खोकल्याचा सामना करावा लागतो. सहसा हा आजार वातावरणातील बदलामुळे होतो. हिवाळ्यात तर तो अगदी चटकन पसरतो. या दिवसात काही नैसर्गिक घरगुती पदार्थ वापरून आपण त्यावर नियंत्रण मिळवु शकतो.
- लिंबु अर्धे कापुन त्यावर काळी मिरी पावडर व मीठ शिंपडुन ते चोखल्यास कफाची तीव्रता कमी होते.
- चमचाभर शुद्ध मधात चिमुटभर पांढरी मिरी पावडर टाकुन दिवसातुन ३ वेळा असे ४-५ दिवस घेतल्यासही खोकला कमी होतो.
- नियमितपणे द्राक्षांचे सेवन केल्याने साधा सर्दी-खोकला लगेच बरा होतो. यामुळे फुफुसाचे कार्य सुधारते आणि कफ शरीराबाहेर पडण्यास मदत होते.
- काळी मिरी पावडर व सुंठ पावडर यांचे मिश्रण मधातुन दिवसातुन २-३ वेळा घेतल्यास खोकल्यापासुन आराम मिळतो.
- हिवाळ्यात दररोजच्या जेवणात लसणाच्या २-३ पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकला होण्याची शक्यता फार कमी असते. हा अगदी साधासोपा ऊपाय आहे.
- आवळा पावडर व मध यांचे मिश्रण तसेच द्राक्षाचा रस आणि मध यांचे मिश्रणही फायदेशीर ठरते.
- पाव चमचा मिरी पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, १ चमचा मध हे सगळे दोन चमचे पाण्यात मिसळावे. खोकल्याची उबळ आल्यावर हे मिश्रण घेतल्यास लगेच आराम मिळतो.
पालकाच्या कोमट रसाने गुळण्या केल्यास कोरड्या खोकल्याचा त्रास कमी होतो. अर्धा चमचा खसखस पेस्ट, ३-४ चमचे नारळाचे दुध आणि चमचाभर मध हे मिश्रण रोज रात्री झोपताना घेतल्यास त्यानेही कोरडा खोकला कमी होतो. १०० ग्रॅम पाण्यात भिजवलेली द्राक्षे तेवढ्याच साखरेत शिजवुन त्याचा सॉस बनवुन ठेवावा. झोपण्यापुर्वी २ चमचे हा सॉस घेतल्याने खोकल्याची ढास येत नाही. तुळस आणि बडिशेपेचा काढाही खोकल्यावर उपयुक्त आहे.
कोरड्या खोकल्यावर बदाम हे रामबाण औषध आहे. पाण्यात भिजवलेले बदाम सोलुन त्याची बारीक पेस्ट करून ती सकाळ-संध्याकाळ लोणी-साखरेत मिसळुन घ्यावी. खोकल्याबरोबरच श्वसनसंस्थेतील इतर बिघाड थोपवण्यासाठी दररोज चार तुळशीची पाने चार मिरीबरोबर चघळावीत. कांद्याचा रस व मध यांचे मिश्रण उत्कृष्ट कफसिरप आहे. उकळत्या पाण्यात एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, एका लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रणही असेच काम करते. यामुळे खोकल्यापासुन तात्काळ आराम मिळतो. कपभर उकळत्या पाण्यात चमचाभर मार्जोरम (कुठरा) घालुन १५-२० मिनिटे तसेच ठेवावे व नंतर त्याचे सेवन करावे.
सकाळी उठल्याबरोबर एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. जेवणानंतरही गरम पाणी घ्यावे. उकळत्या पाण्यात निलगिरीची व पुदिन्याची काही पाने टाकुन त्याचा वाफारा घ्यावा. हळकुंड भाजुन त्याची पावडर करून ती रोज घ्यावी. वरील साधे-सोपे, नैसर्गिक, घरगुती व कोणतेही दुष्परिणाम नसलेले ऊपाय वापरून हिवाळा कसा सुसह्य होतो हे आजमावुन पहा.

