Follow Us @soratemplates

Wednesday, 30 March 2016

02:01 0 Comments

संसाराच्या नावाखाली दोन वेगवेगळी माणसं एकाच घरात राहायला सुरुवात करतात.
'ती एकत्र आहेत' असं नाही म्हणता येत.....
दोन वेगेवेगळी मनं...दोघांचे विचार वेगवेगळे...मतं वेगवेगळी....आवडी निवडी वेगळ्या.....
होमकुंडासमोर हार घातल्या घातल्या स्वत:ला समोरच्याच्या हवाली करायचं,
लहानपणा पासूनच्या सगळ्या सवयी एका क्षणात परक्या करायच्या...
त्याग, समजूतदारपणा हे सगळं मोठं मोठं क्षणात समजून घ्यायचं....
इतकं सोप्पं असतं का हे सगळं ?
पण करणं भाग असतं....
'संसार' हा विस्कटलेल्या पसाऱ्यासारखा असतो...थोडं देऊन थोडं घेऊन सगळं गोळा करावं लागतं....
हरवलेलं शोधावं लागतं आणि लपवलेलं मिळवावं लागतं...
समोरचा नेहमीच चुकीचा कसा असू शकेल...?....
संसारासाठी मनं शांत हवी....समोरच्याचं म्हणणं ऐकून घेण्याची हिंमत हवी,धीर हवा...
भांडायला बहुतेक सगळ्यांना जमतं....मांडायला नाही जमत....
भांडलं कि तुटतं अन् मांडलं कि एकजुटतं......

एकुण काय तर वयातील अंतराने काहीही फरक पडत नाही

Tuesday, 29 March 2016

त्यानं किंवा तिनं प्रेम केलं,तुमचं काय गेल?

08:52 0 Comments

Junich kavita pn navyane aathvli.

त्यानं किंवा तिनं प्रेम केलं,तुमचं काय गेलं?
त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं?

तो तिला बागेमधे एकांतात भेटला,
नको इतक्या जवळ जाउन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचं फ़ुल होवुन पेटला,
भेटला तर भेटुदे की,पेटला तर पेटुदे की,
तुमच्या घरचं बोचकं त्यांनी उचलुन थोडचं नेलं?

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?

एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली,
पाउस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हा कोणी नव्हतं म्हणुन त्यांचं फ़ावलं,
आणि त्यानी तिला घरात घेउन चक्क दार लावलं,
लावलं तर लाउदे की,व्हायचं ते हो उदे की,
खिडकीतुन फ़ुकट सगळं बघता तर आलं,

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?

घरात जागा नसते,त्यांचं चालणारच टॅक्सित प्रकरणं,
ते थोडेच बसणार आहेत,पाणिनीचं घोकीत व्याकरणं,
गुलाबी थंडीचे परीणाम हे होणारचं,
कुणितरी कोणालातरी घट्ट मिठितं घेणारचं
घेतलं तर घेउ दे की,व्हायचं ते हो उदे की,
तुमच्या आमच्या पूर्वजांनी आणखी वेगळं ते काय केलं,

शेवटी, कानटोपी घातली म्हणून फुलं काही फुलणार नाहीत ...
तुमच्या रुद्राक्षाना भियून पाखर काही झुलनार नाहीत ....
झुलले तर झुलू दया की, फुलाले तर फुलू दया की ...
तुमचं डोकं कशासाठी तापलं.....

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करु दे की...
मला सांगा तुमचं काय गेलं ?

08:43 0 Comments

रडू तर येत होत ...
डोळ्यात मात्र दिसत नव्हत...
चेहरा तर कोरडा होता ....
पण मन मात्र भिजत होत....
... डोळ्याच रडणे हे कामच असत ....
... कारण डोळे पाहणारे
बरेच असतात ....
पण ....
मनाचे रडणे दिसत
नाही...
कारण ...
मन जाणणारे कमी
असतात.....

Monday, 28 March 2016

21:16 0 Comments

एक कटोरी हातात घेऊन..
त्यात एक गच्च भरलेली पाणी-पुरी
ती उचलून तोंडात भरायची
तिचं ते गटकन फुटुन तोंडभर पसरणं
मग सगळीकडुन येणारा पूर आणि धूर
कधी तोंडातून.. कधी नाकातून
कानशीलाजवलून वहाणारा ओघळघामाचा
लागलेला तो ठसका जीवघेणा..
आणि त्यानंतर रेंगाळलेली ती चव.. हवीहवीशी.!!
.
.
आयुष्यही असच काहीसं..
रोज त्याला हातात घेऊन उभं रहायचं
नव्याने भरलेली पाणी-पुरी खायची..
उसळणा-या लाटात मग डुंबायचं कीबुडायचं..
ते ज्याचं त्यानेच ठरवायचं
लागतो कधी जीवघेणा ठसकासुद्धा
आणि त्यानंतर जगावसं वाटणारा दिवसनवा नवासा..!!
पण .. फक्त..
"भय्या... ज़रा मिठा बनाना" असे इथेही सांगता आलं असतंतर.. !!!!!!

- अनुराधा म्हापणकर

09:19 0 Comments

आपण जरी बोललो नाहीत तरी आपल्या आठवणी बोलतात,
तुझ्या माझ्या मधले ते क्षण डोळे भरून आणतात,
सोबतीचा हात तुझा त्या माझ्या हातात देतात,
मी विचारले ना कि कोण आहे ,
तर त्या मला माझ्या हृदयात पाहायला सांगतात,
आपण जरी बोललो नाहीत तरी आपल्या आठवणी बोलतात..........

07:48 0 Comments

काही क्षणाची सोबत....
पुरेशी असते जन्माभरासाठी
जगण्यासाठी दोनच शब्द
पूरतात आयुष्यभरासाठी

काही क्षणांचा सहवास....
जगण्याचे कारण बनून जातो
प्रेमाचे दोन शब्दच मग
आयुष्यच धेयय बनून जात

...काही क्षणाची आठवन
उत्साह देते मनाला
जणू सर्व आकाश आपलेच आहे
मनसोक्त उडायला.....

06:56 0 Comments

कुणाचेच नसतात हक्क कुणावर
पण तरीही डोळे भरतातच ना ?
मुळात अपेक्षाच करु नये
अशा पण तरीही आस लागतेच ना?
हिशोब मांडायचा सारा
तर आकडे पडतील कमी,
...तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना?
लाख झाला असेल मनाचा दगड ,
तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना?
तोडताना जोडलेली नाती मनातवेदना होतातच ना?
या सगळ्यातनं हाती उरायचे शून्य,
पण तरीही जीव जडतातच ना ?

Saturday, 26 March 2016

10:42 0 Comments

जीवनात मागे बघाल तर,
अनुभव मिळेल..
जीवनात पुढे बघाल तर,
आशा मिळेल..…
इकडे -तिकडे बघाल तर,
सत्य मिळेल..
आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर,
आत्मविश्वास मिळेल....

10:22 0 Comments

काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....

मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत

वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत
पावल अडखलली तरी चालण
नाही थांबत

अंतर वाढल
म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण
नाही थांबत.

10:13 0 Comments

किती छान असत ना....?
आपण कोणाला तरी आवडण,
कुणीतरी मनापासून आपला विचार करण..
कुणाच्या तरी डायरीत आपल नाव असण..
कुणीतरी आपल्या फोन
ची मनापासून वाट पाहण...
कुणालातरी आपले अश्रू
मोत्या सारखे वाटण.....
आपल्या उपवासाच्या दिवशी
हटकून उपाशी राहण ...
झोपल्यावर हि मात्र
स्वप्नात आपल्याला पाहण....
खरच खूप खूप छान असत ना.?
आपण कुणाला तरी आवडण...

03:23 0 Comments

हल्ली आनंदी आणि समाधानी माणसं दुर्मिळ झाली आहेत...

कोणाशी जरा बोलायला जा,
तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा

‘माझ्याकडे वेळ नाही,
माझ्याकडे पैसे नाहीत,
स्पर्धेत टिकाव कसा लागेल,
आज पाऊस पडतोय,
माझा मूड नाही !’....

आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत...

काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे...
पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय

Isn't it strange ?

मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?

सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?

आंघोळ करताना गाणं म्हणताय,

कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?

पाऊस पडतोय ?
सोप्पं आहे - भिजायला जा !

अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला 'मूड' लागतो ?

माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात....

परमेश्वराने एका हातात
'आनंद'
आणि एका हातात
'समाधान'
कोंबून पाठवलेलं असतं....

माणूस मोठा होऊ लागतो,
वाढत्या वयाबरोबर
'आनंद' आणि 'समाधान'
कुठे-कुठे सांडत जातात....

आता 'आनंदी' होण्यासाठी
‘कोणावर’ तरी,
‘कशावर’ तरी
अवलंबून राहावं लागतं....

कुणाच्या येण्यावर...
कुणाच्या जाण्यावर...
कुणाच्या असण्यावर...
कुणाच्या नसण्यावर...

काहीतरी मिळाल्यावर...
कोणीतरी गमावल्यावर...
कुणाच्या बोलण्यावर...
कुणाच्या न बोलण्यावर...

खरं तर,
'आत' आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय....

कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं...

इतकं असून...

आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत,
पाण्याच्या टँकरची वाट बघत...
जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !....

इतरांशी तुलना करत
आणखी पैसे,
आणखी कपडे,
आणखी मोठं घर,
आणखी वरची 'पोजिशन',
आणखी टक्के.. !

या 'आणखी' च्या मागे
धावता धावता त्या
आनंदाच्या झऱ्यापासून
किती लांब आलो आपण !....

Friday, 25 March 2016

08:41 0 Comments

गुलज़ार नेहमी म्हणतात , गीतकार जर चलाख आणि हुशार असेल तर त्याच्या गाण्यात निरनिराळे स्तर सापडतात. एक स्तर वेगळा केला कि तुम्हाला अजून एक सापडतो, तो वेगळा केला कि अजून एक असे एका खाली एक अर्थ दडलेले असतात त्याच्या गाण्यात आणि मग या अश्या पद्धतीनी तो चलाख गीतकार दिग्दर्शकाला जे सांगायचं त्या व्यतिरिक्त गीतकाराला जे सांगायचं ते अत्यंत गुप्तपणे तुम्हाला सांगून जातो.
आता हे गाणं ....
हे सुरूच होतं दुःखानी एक प्रकारच्या भयंकर यातनेनी -आर्तता.... अशी यातना, असं दुःख कि जे आपलं जवळचं कोणी हरवल्यांनी झालंय
आदी...वेड्यासारखा सुहानी ला शोधतोय आणि बॅकग्राऊंड ला
" बंजर है सब बंजर है
हम ढुंढने जब फ़िरदौस चले,
तेरी खोज तलाश में देख पिया
हम कितने काले कोस चले..."

प्रेमानी पछाडलेला तो त्याच्या तिला अक्षरशः वेडा बनून जंग जंग शोधतोय. शाद अलीनी याचं उत्तम दिग्दर्शन केलंय म्हणायला हरकत नाही. गाणं पाहताना खरोखरंच आदी ची तळमळ, त्याची आर्तता जाणवते.

पण या गाण्याला सुफी रंग आहे, आदी सुहानी प्रकरण काहीवेळ नजरेआड केलं तर हे लक्षात येईल, गुलज़ारच्या बऱ्याच रचनांमधून हे सुफी रंग जाणवतात. गुलज़ारसाठी देव नक्कीच दगडा-मूर्तीत नाही तर प्रेमात आहे.
जेव्हा तुमचं प्रेम पराकोटीला पोहचलेलं असतं, जेव्हा तुम्ही एकरुप झालेले असता आपल्या प्रेमाशी, तेव्हा तुम्हाला देव सापडलेला असतो.
या गाण्यात
" तेरा साया कहीं तो बोलेगा मैं सुनता रहा परछाईयां" ही एक ओळ आहे जी मला " मैं हवा पे ढूंढू उसके निशान" या छैंया छैंया मधल्या ओळीची आठवण करुव देतं
नुसतंच जाणवणारं पण न दिसणारं, स्पर्शताही न येणारं असं काही ऐकून त्या प्रेमाची (किंवा सुफी अंदाजाप्रमाणे देवाचीं) किमान एक झलक, झलक नाही तर किमान एक खूण तरी मिळेल या आशेवर  जगायचं.…..हे सोपं नाही!!
छैंया छैंया काय किंवा हे गाणं काय दोन्ही सुफी अंगानी जाणारीच आहेत पण
" जिनके सर हो इश्क की छांव पांव के नीचे जन्नत होगी"
ज्याला प्रेम मिळालंय, जो प्रेमात आहे त्याला स्वर्ग दोन बोटांवर आहे...
आणि
" बंजर है सब बंजर है गम ढूंढने जब फिरदौस चले"
स्वर्गा(सुखा)च्या शोधात निघाल्यावर फक्त खडकाळ रस्ताच असणांरे( कष्ट असणारेत)
म्हणजेच हे स्वर्ग नाही तर पुन्हा प्रेमासोबत असणं त्याच्याशी एकरुप होणंच मग स्वर्ग काय आणि काय काय ...तुम्ही कुठेही गेलात तरी 'फिरदौस, जन्नत, स्वर्ग' च असणार तुमच्यासाठी....
~अवंती

07:51 0 Comments

श्वास

किती काळ भांडायचं,
किती काळ धरायचा अबोला
किती काळ पाहूनही फिरवायची नजर
अन् किती काळ टाळत राहायचं एकमेकांना?

दुखावलेले क्षण प्रत्येक वेळी
आठवत राहायचे तरी किती काळ?
दुरावण्याचा प्रसंग पुन्हा नव्यानं,
जाणीवपूर्वक सोसत राहायचा तरी किती काळ?

थांबू या ना आता.
एकमेकांच्या नजरेत पाहून
स्वच्छ हसून पाहू या ना एकदा.
सांधलं जाणार नाही,
गाठ सुटली, तरी त्याची खूण राहील
हे ही मान्यच आहे;
पण गाठीपेक्षा खूण हलकी नाही का?

खूप काळ चालतो आहोत आपण
असेच एकटे, एकाकी,
एकमेकांची साथ जाणीवपूर्वक नाकारून.

मिळवलं काय आणि गमावलं काय नक्की?
हिशेब लागता लागत नाही
आता वाटतं किमान अढी सोडावी
आणि माफ करून टाकावं एकमेकांना...

खूपदा अडकलाय श्वास
खूपदा अश्रूंनीही दिली आहे त्याला साथ
त्यांच्याही नकळत.
आता उरलेले श्वास तरी घेऊ
मोकळेपणानं...
एकमेकांसाठी आज
इतकं नक्कीच करू शकतो ना आपण?

- अभिजित थिटे

06:22 0 Comments

तिसरी गोष्ट....

त्या दोघांचं छान जमलं होतं. दोघंही एकमेकांसाठीच जन्माला आल्यासारखे. एकमेकांवर नितांत प्रेम असणारे. फक्त नंतर जरा गडबड झाली. दोघंही आपापल्या कामात गुंतून गेले आणि एकमेकांकडेही लक्ष द्यायला हवं, हेच विसरले. सुरुवातीला रोजचं फोनवरचं बोलणंही हळूहळू कमी झालं. मोबाइल होते, तरी ते जमेनासं झालं. gm आणि gn अशा शॉर्टफॉर्मपर्यंत पोहोचले. काहीतरी बिघडतंय, हे जाणवलं असेल कदाचित त्यांनाही. फक्त त्याचे परिणाम काय होतील, याची त्यांना कल्पनाच आली नाही.
हळूहळू तर मेसेजही बंद झाले. काय बोलायचं, हे सुचेनासं झालं. मग कधीकधी भांडणं व्हायची कडाक्याची. तू असाच का वागतोस आणि तू अशीच का करतेस याचे दाखले एकमेकांवर फेकले जायचे. तारीख, वार, वेळेसकट पुराव्यांची देवघेव व्हायची.
आपण दोन-दोन महिने भेटत नाही हे जाणवायचं; पण भेटल्यावर इतर काही बोलण्याऐवजी पुन्हा एकदा तारखांची मारामारी सुरू व्हायची.
आपण थांबू या का, असं त्यानं तिला सतरांदा विचारून झालं. तीही वैतागायची. यालाच थांबायची घाई झालेली दिसते, असं वाटायचं. खरंतर तिलाही मनोमन कळत होतं सगळं; पण त्याची समजून घेण्याची वृत्ती नाही, यावर ती ठाम होती.
विचित्र वळणाला येऊन थांबलं सगळं. कारण समोर दिसत होतं. उपायही हातात होता; पण दोघांचंही आपल्याला वेळच नाही आणि समोरचा समजून घेत नाही, या गोष्टीवर अधिक प्रेम होतं.
खरंतर बोलणं सुरू करणं. रोज मेसेज करणं, दोन दिवसांतून एकदा फोन करणं, पूर्वीसारखं रोज नाही जमणार; पण महिन्यातून दोनदा भेटणं हे साधे उपाय होते. त्याविषयी बोलणंही झालं होतं. फक्त हे उपाय अंगवळणी पडत नव्हते. उलट तूच रोज मेसेज केला नाहीस, तूच फोन करत नाहीस, तू कधीही स्वतःहून भेटण्याविषयी बोलत नाहीस, हे नवे आरोप सुरू झाले.
त्यांचं नातं अजूनही हे असंच आहे. सोडवली तर गाठ सुटणारच आहे. ती सुटावी, असं दोघांनाही वाटतं, फक्त गाठ सोडवण्याची, ती सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायची तयारी नाही.

फक्त एकमेकांचे होणं महत्त्वाचं नसतं. एकमेकांना वेळ देणं, एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकांशी बोलत राहणं, एकमेकांची छोटी छोटी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं हे महत्त्वाचं असतं. त्याचा विचार करायलाच हवा.
-अभिजित थिटे

तिसरी गोष्ट

06:21 0 Comments

तिसरी गोष्ट....

त्या दोघांचं छान जमलं होतं. दोघंही एकमेकांसाठीच जन्माला आल्यासारखे. एकमेकांवर नितांत प्रेम असणारे. फक्त नंतर जरा गडबड झाली. दोघंही आपापल्या कामात गुंतून गेले आणि एकमेकांकडेही लक्ष द्यायला हवं, हेच विसरले. सुरुवातीला रोजचं फोनवरचं बोलणंही हळूहळू कमी झालं. मोबाइल होते, तरी ते जमेनासं झालं. gm आणि gn अशा शॉर्टफॉर्मपर्यंत पोहोचले. काहीतरी बिघडतंय, हे जाणवलं असेल कदाचित त्यांनाही. फक्त त्याचे परिणाम काय होतील, याची त्यांना कल्पनाच आली नाही.
हळूहळू तर मेसेजही बंद झाले. काय बोलायचं, हे सुचेनासं झालं. मग कधीकधी भांडणं व्हायची कडाक्याची. तू असाच का वागतोस आणि तू अशीच का करतेस याचे दाखले एकमेकांवर फेकले जायचे. तारीख, वार, वेळेसकट पुराव्यांची देवघेव व्हायची.
आपण दोन-दोन महिने भेटत नाही हे जाणवायचं; पण भेटल्यावर इतर काही बोलण्याऐवजी पुन्हा एकदा तारखांची मारामारी सुरू व्हायची.
आपण थांबू या का, असं त्यानं तिला सतरांदा विचारून झालं. तीही वैतागायची. यालाच थांबायची घाई झालेली दिसते, असं वाटायचं. खरंतर तिलाही मनोमन कळत होतं सगळं; पण त्याची समजून घेण्याची वृत्ती नाही, यावर ती ठाम होती.
विचित्र वळणाला येऊन थांबलं सगळं. कारण समोर दिसत होतं. उपायही हातात होता; पण दोघांचंही आपल्याला वेळच नाही आणि समोरचा समजून घेत नाही, या गोष्टीवर अधिक प्रेम होतं.
खरंतर बोलणं सुरू करणं. रोज मेसेज करणं, दोन दिवसांतून एकदा फोन करणं, पूर्वीसारखं रोज नाही जमणार; पण महिन्यातून दोनदा भेटणं हे साधे उपाय होते. त्याविषयी बोलणंही झालं होतं. फक्त हे उपाय अंगवळणी पडत नव्हते. उलट तूच रोज मेसेज केला नाहीस, तूच फोन करत नाहीस, तू कधीही स्वतःहून भेटण्याविषयी बोलत नाहीस, हे नवे आरोप सुरू झाले.
त्यांचं नातं अजूनही हे असंच आहे. सोडवली तर गाठ सुटणारच आहे. ती सुटावी, असं दोघांनाही वाटतं, फक्त गाठ सोडवण्याची, ती सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायची तयारी नाही.

फक्त एकमेकांचे होणं महत्त्वाचं नसतं. एकमेकांना वेळ देणं, एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकांशी बोलत राहणं, एकमेकांची छोटी छोटी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं हे महत्त्वाचं असतं. त्याचा विचार करायलाच हवा.

03:50 0 Comments

व्यक्त होणं ही प्रत्येक माणसाची गरज आहे. मग तो सधन असो, गरीब असो, वा अगदी मुका असो… स्वत:ला व्यक्त करणं हे कुणी टाळू शकत नाही. प्रत्येकाचे व्यक्त होण्याचे प्रमाण, गरज आणि माध्यम हे बदलत असतं. प्रेयसीला 'आय लव यु म्हणणं' असो की आपल्या बाळाला घट्ट कुशीत घेणं असो, जो तो आपल्या परीने व्यक्त होत असतोच. कुणासाठी नकळत डोळ्यात आलेलं पाणी हेदेखील व्यक्त होणंच आहे. व्यक्त होणं हे थांबवता येत नाही.

नजरेने व्यक्त होता येतं, स्पर्शाने व्यक्त होता येतं.
व्यक्त होण्यासाठी शब्दांची गरज लागतेच असंही नाही.
पण तरी, शब्द ही ताकद आहे. माणसाच्या आयुष्यातला हा असा एक शोध जो प्रगतीचा पाया आहे.
या शब्दांमुळे माणूस आज कुठूनही कुठेही व्यक्त होवू शकतो. मग ह्या व्यक्त होण्याला बंधनं का लावायची, याचं कारण मला समजत नाही.

03:08 0 Comments

सोनेरी पैठणी

कोणतंही नातं एका क्षणात तुटत नाही...
ते कणाकणाने तुटत असतं...
वारंवार होणा-या आघातांमुळे...
घट्ट जवळिकीचे धागे हळूहळू विरत जातात...
दुरावा वाढत जातो.
क्षीण झालेले धागे
अखेर अलग होतात...
परिश्रमाने,हळूवारपणे तयार झालेली पैठणी काळाच्या फटक्याने अखेर विरते,धसते....तरीही पैठणी तशीच जपून ठेवतो आपण...
विरलेल्या तरीही जपून ठेवलेल्या पैठणीमधील जरीची सोनेरी चमक मात्र कमी होत नाही...
नातं दुरावलं तरी
दुरावलेल्या नात्यातील सोनेरी क्षणही असेच कधीतरी मनामध्ये चमकतात...
अचानक...
सोनेरी पैठण्या खूप जमल्यात मनामघ्ये...
- Ulka raut

Thursday, 10 March 2016

10:28 0 Comments

एखाद्या व्यक्तीवर 'प्रेमाचा हक्क असणं' वेगळं..
आणि त्या व्यक्तीने तो हक्क मान्य करणं वेगळं..
कारण..
'प्रेमाचा हक्क असणं' हे निव्वळ प्रेम असतं..
पण तो हक्क 'मान्य करणं' म्हणजे जबाबदारी असते..!!
ते प्रेम निभावून नेण्याची..!!
#Mithila subhash

06:14 0 Comments

ये sms अपने जीवन के अच्छे दोस्तों को भेजो, मुझे भी करना अगर मैं हूँ तो? अगर 6 sms आपको वापिस आये तो
U r so lucky...........

एक बार राधा जी ने कृष्णा से पूछा : गुस्सा क्या है..?
बहुत खुबसूरत जवाब मिला : किसी की गलती की सजा खुद को देना..!

एक बार राधा ने कृष्णा से पूछा : दोस्त और प्यार में क्या फर्क होता है..?
कृष्णा हंस कर बोले : प्यार सोना है.. और दोस्त हीरा.. सोना टूट कर दुबारा बन सकता है.. मगर हीरा नहीं..!

एक बार राधा जी ने कृष्णा से पूछा : मैं कहाँ-कहाँ हूँ..?
कृष्णा ने कहा : तुम मेरे दिल में.. साँस में.. जिगर में.. धड़कन में.. तन में.. मन में.. हर जगह हो..!
फिर राधा जी ने पूछा : मैं कहाँ नहीं हूँ..?
तो कृष्णा ने कहा : मेरी किस्मत में..!

राधा ने श्री कृष्णा से पूछा : प्यार का असली मतलब क्या होता है..?
श्री कृष्णा ने हंस कर कहा : जहाँ मतलब होता है.. वहां प्यार ही कहाँ होता है..!

एक बार राधा ने कृष्णा से पूछा : आपने मुझे प्रेम किया.. लेकिन शादी रुकमनी से की.. ऐसा क्यों..?
कृष्णा ने हँसते हुए कहा : राधे! शादी में दो लोग चाहिए.... और हम तो एक हैं....
😀😀😀😀😀😀😃😃😃
😀ये special smile    😀
😀है, इसे आप उन लोगों  😀
😀को send kro          😀
😀जिन्हें आप कभी        😀
😀उदास नहीं देखना चाहते.
मैंने तो कर दिया

Wednesday, 9 March 2016

20:46 0 Comments

प्रत्येक गोष्ट जर शब्दांतून व्यक्त करता आली असती
तर श्वास,  नजर आणि स्पर्श ह्याला किंमत राहिली नसती..!

जीवन सर्वांसाठी सारखच असते,
फरक फक्त एवढाच असतो

"कुणी मनासारखं जगत असतं आणि
"कुणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!

शुभ सकाळ

19:46 0 Comments

आज अचानक ऋतू बदलला आणि पाऊस झाला... अवकाळी पावसाने सगळ्यांना चिंब भिजवले.
'लेह'साठी हे काही नवीन नाही.. इथे क्षणात ऊन आणि क्षणात पाऊसही होतो, वर्षभरातील सर्व ऋतू एकाच दिवसात दिसतात.
नात्यांचेही काही असेच.... म्हणूनच लेह विषयी एक गूढ आकर्षण आहे... देह आणि लेह ..एकरूप होत जाण !
बहुरंगी पण सतत बदलणारं... कधी भंगणारं तर कधी अभंग... मग मन कधी पांगोंगचं सरोवर बनून जातं, अंदाज न येणारं !
हिमागद्यासारख चमकणारं.. वासना आणि गैरसमजाची वादळं सगळच धोकादायक ...तरीही  दिपवून टाकणारं..!
#Anuraag #11march #RediscoverLove #AmbarishDarak Mrunmayee Deshpande

19:24 0 Comments

काहीतरी नाही... खूप काही बदललंय....
तुझ्या माझ्या... नात्यामध्ये...

आज तू नाही... तुझ्या आठवणी...
तेवढ्याच उरल्यात... हातामध्ये...!

#एक_जूनी_आठवण
#sager kale

तुला विसरण शक्य नाहि..

19:20 0 Comments

विसरुन जा मला ,
माझ्या सार्या क्षणांना , सार्या आठवणींना
भेटू नकोस पुन्हा कधी...
कधी सादही देऊ नकोस

जे झालं ते एक स्वप्न समज फक्त
जे खूप सुंदर असलं तरी जास्त दिवस आठवणीत नसतं तसंच

हे बोलणं तुझ्यासाठीही काही सोप नव्हतं
ना मला ते अनपेक्षितपणे ऐकणं

तु तर गेलास बोलुण कधी नाही तितक्या सहजपणे कारण मी आजवर फक्त अबोलाच पाहिला होता तुझ्या अबोल ओठांवर

पण
आता असं वाटतंय
तुझा अबोलाच बरा होता
निदान त्यातुन मी माझ्या मनासारखे अर्थ लावु शकत होते

जीव तर जळत होता तेव्हाही पण आज तुझ्या नाजुक ओठ्यातल्या शब्दांनी घायाळ केलंय
तुझ्या त्या लुकलुकणार्या चांदण्यांसारख्या लवणार्या पापण्या
आज स्तब्ध असल्या तरी माझा जीव खूप वरखाली होतोय

तुझा विरह जगलाय मी
तुझ्याविना तुझ्या आठवणींसोबत
पण
आता तुझ्याविना जगणं खूप अवघड होऊन बसलंय
आणि तुझ्या शब्दांनी आज सर्वच हरवलंय माझं

पण विसरुन जाईल या तुझ्या शब्दांनाच एक स्वप्न समजुन

कारण तुला विसरणं शक्य नाही...
कधिच शक्य नाही

#तुझ्याविना
#अबोल_प्रीत

07:56 0 Comments

फ़क्त तुझ्यासाठी
तुझी वाट पाहतांना दिवस संपतात
पणं वाट पाहणं संपत नाही
आयुष्यावरीलं तुझी छाप पुसुन टाकणं
का रे मला जमत नाही?
का तुझा सहवास दरवळत राहतो आजही?
का खोलवर
झालेल्या जखमा बुजता बुजता पुन्हा वाहायला लागतात?
का ती वेदना नको असतांनाही हवीहवीशी वाटत
राहते?
का तुझी आठवणं नको असतांनाही येतचं राहते?
का पुन्हा पुन्हा मला तुझ्याचंकडे खेचुन नेते??? SP