कधी कधी आपण खुप busy असतो. श्वास घ्यायची उसंत नसते इतके busy. नेमकं त्याचवेळी आपल्याच जवळचं कुणीतरी आपला अंदाज घेत येतं ... व्यक्त होण्यासाठी, काहीतरी बोलण्यासाठी. आपल्यालाही जाणवत ते, पण आपण busy आहे रे/ ग नंतर बोलू...नक्की बोलूं अशी शाश्वती देत ती वेळ टाळतो.
पण त्या मनाला नसते न सबुरी, धीर (खरंतर कोणत्याच मनाला नसतो धीर) आणि मग ते अधीर, सैरभैर मन स्वतःला एकटेपणाच्या खाईत लोटून देतं... आपल्या कानावर आत्महत्येची बातमी येते...देहाची असो भावनेची हत्या ती हत्याच न... वेदना आहेच तिथे... ते ऐकून मनात चर्रर्र होतं, पुरते हलून जातो आपण. पण तोवर सगळं संपलेलं असत...सगळंच. आयुष्यभर साला आपल्यामुळे तर हे झालं नाही न??? हा सल घेऊन जगण्यापेक्षा काही क्षण दुसऱ्याचे होऊन जगा. कामं काय होतीलच माणसं जपा. आपली खरंच कुणाला गरज आहे तर द्यावा थोडा वेळ. काय सांगावं आपल्यापाशी बोलल्यावर एखाद्याच्या मनावरचं ओझं उतरेल. बघा पटतंय का.
प्रतिमा...
