आकर्षणापलीकडे जेव्हा नातं जुळतं जन्माचं तेव्हाच खूप खूप दूर राहूनसुध्दा एकमेकांसाठी डोळे भरून येत असतील....
भरून येतात डोळे....आणि ह्रदयसुध्दा रडू लागतं....पण ते भरून येणं असतं , तिसर्या कोणालाही न जाणवणारं....न दिसणारं....
आरती प्रभू लिहीतात....
" एकाच एकाच वेळी दोघांचे डोळे.
दाटून दाटून आले; वाहू न गेले....."
Love these lines to the core ........
कवितेचा त्या दोघांना घेऊन पुढे जाते......
भरले दोघांनी पेले, ओठांशी नेले
काळोख गर्जत आले नदी नी नाले.........
त्या दोघांची प्रत्यक्ष न भेटताही होत जाणारी उत्कट भेट....
कोणत्या दोन त्या लाटा जवळ आल्या
वाकड्या ह्रदयवाटा जोडीत गेल्या. .....
.............
आणि मग.....
" एकाच एकाच वेळी दोघांचे डोळे.
दाटून दाटून आले; वाहून गेले....."
फक्त एकमेकांसाठी.....
----- सलील कुलकर्णी
Friday, 8 July 2016
by
सोनाली कुलकर्णी
on
22:41
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment