आकर्षणापलीकडे जेव्हा नातं जुळतं जन्माचं तेव्हाच खूप खूप दूर राहूनसुध्दा एकमेकांसाठी डोळे भरून येत असतील....
भरून येतात डोळे....आणि ह्रदयसुध्दा रडू लागतं....पण ते भरून येणं असतं , तिसर्या कोणालाही न जाणवणारं....न दिसणारं....
आरती प्रभू लिहीतात....
" एकाच एकाच वेळी दोघांचे डोळे.
दाटून दाटून आले; वाहू न गेले....."
Love these lines to the core ........
कवितेचा त्या दोघांना घेऊन पुढे जाते......
भरले दोघांनी पेले, ओठांशी नेले
काळोख गर्जत आले नदी नी नाले.........
त्या दोघांची प्रत्यक्ष न भेटताही होत जाणारी उत्कट भेट....
कोणत्या दोन त्या लाटा जवळ आल्या
वाकड्या ह्रदयवाटा जोडीत गेल्या. .....
.............
आणि मग.....
" एकाच एकाच वेळी दोघांचे डोळे.
दाटून दाटून आले; वाहून गेले....."
फक्त एकमेकांसाठी.....
----- सलील कुलकर्णी
Friday, 8 July 2016
Tuesday, 5 July 2016
तुझ्या मिठीत आल्यावर ,
डोळे हळूवार मिटतात..
मिठी घट्ट होताच,
ओठ ओठाला भिडतात...
प्रगती कुलकर्णी
कविता तुला सुचावी ,
रिमझिम पावसाची..
अन् नकळतच भेट व्हावी
ओल्याचिंब आपल्या मनाची...
-प्रगती कुलकर्णी
नजरेने नजरेला साद घालता..
हास्याची नाजुक कळी चेहर्यावर तुझ्या फुलली.
अन् त्याचक्षणी..
आपल्या प्रेमाला नवी पालवी फुटली...
स्पंदन@प्रगती कुलकर्णी
कोसळणारा पावसाचा प्रत्येक थेंब ,
तुझी एक एक आठवण घेऊन येतोय.....
मनाच्या हवळ्या कप्यात ,
त्याची सुरेख जागा करुन जातोय...
स्पंदन@प्रगती कुलकर्णी
शब्द तुझे थांबतील तेव्हा
श्वासही माझे निरोप घेतील....
प्रेमवेड्या तुझ्या प्रियेचे
आयुष्याचे सारे क्षणही संपून जातील...
_प्रगती
तुझ्या श्वासांना माझ्या श्वासांची
नेहमीच साथ असेल...
तु घाबरु नकोस राणी ,तुझ्यासाठी मी त्या यमाच्याही डोळ्यात धूळ फेकेल..!
-हर्ष
तुझ्या मिठीत विरघळताना
मी नेहमी खुष होते...
मग नेहमीच सांजवेळी तुझी
मजला ,मिठीतली आठवण ती छळते..
-प्रगती कुलकर्णी
