Follow Us @soratemplates

Thursday, 5 May 2016

21:06 0 Comments

सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण
पाण्यात राहूनही मग माशाची भागात नाही तहान

स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खूप
वाटी - वाटीने ओतलं तरी कमीच पडतं तूप

बायका आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ
पैसा आणून ओतेन म्हणतो, पण मागू नका वेळ

Career होतं जीवन मात्र, जगायचं जमेना तंत्र
बापाची ओळख मुलं सांगती पैसे छापायचं यंत्र

चुकून सुट्टी घेतलीच तरी स्वतः पाहुणा स्वतःच्याच घरी
दोन दिवस कौतुक होतं नंतर डोकेदुखी सारी

मुलंच मग विचारू लागतात बाबा अजून काहो घरी ?
त्यांचाही दोष नसतो, त्यांना सवयच नसते मुळी

क्षणिक ऒदासिन्य येतं, मात्र पुन्हा सुरु होतं चक्र
Career Career दळण दळता, स्वाथ्य होतं वक्र

सोनेरी वेळी वाढत जातात, घराभोवती चढलेल्या
आतून मात्र मातीच्या भिंती, कधीही न सारवलेल्या

आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवू लागतं काही
धावण्याच्या हट्टापायी श्वासच मुळी घेतला नाही

सगळ काही पाहता पाहता आरशात पाहणं राहून गेलं
सुखाची तहान भागता भागता समाधान दूर वाहून गेलं

Friday, 22 April 2016

11:18 0 Comments

Graduate होऊन आता बरेच वर्ष झाली आपल्यला ,...आज खूप दिवस झाल्यानंतर तुला सांगावस वाटतय ,...मला आवडलेली पहिली व्यक्ती ज्याच्याबद्दल प्रेम वाटायला लागलेलं ती तू होतास .,.पण unfortunately मला कळाल तू जे message  करायचास सीमाला  त्यावरून, त्यातला एक आठवतोय ,."कल हो न हो"  चा,.आणि मग मला वाटायला लागल कि तुला ती आवडते ,आणि .नंतर  तुमच्यात .घडलेला .प्रकार  .कळला आणि आधीच तूच,माझ्यशी बोलन कमी केल होतास ,..आणि मग मी पूर्णच बोलयची बंद झाले तुझ्याशी,,..पण त्यामुळ न तुझ्यासारखा एक छान मित्र गमावले मी ,....तिने तुला नकार दिला आणि तिच्यासाठी मी तुला पूर्णच तोडलं ...खूप त्रास झाला मला,.म्हणून परत पुण्यात आल्यावर भेटले तुला ....पण तुझ्या डोळ्यात मला कधी मैत्रीचे ते भाव पण नाही दिसले,...
प्रत्येक २२अप्रिल ला रात्री १२ वाजता wish  कराव वाटत tula...पण तेवडे जवळचे कधीच नाही राहिलो,.,..खूप दिवस तू फेसबुक वर पण माझी request  Accept नाही केलीस...,,.
पण कदाचित आपण बाकी काही नाही तर एकमेकांचे best  friends  तरी झालो असतो ...असो ,..
आज म्हणालास न तू position मुळे खूप busy  असतो मी ,...आनंद वाटला ,..खूप काही मिळवलंस तू आणि इथून पुढे हि मिळव ,...असाच यशस्वी हो ...तुला माझ्या खूप शुभेच्छा ...!!"

Wednesday, 20 April 2016

21:01 0 Comments

How a Password Changed my Life ... A true story from the Reader’s Digest ...

I was having an average  morning until I sat down in front of my office computer .
"your password has expired”, a server message flashed on my screen, with instructions for changing it...
In my company we have to change passwords monthly..
I was deeply depressed after my recent divorce. Disbelief over what she had done to me was what I thought all day long ....

I remembered a tip I’d heard from my former boss. He’d said, “I’m going to use a password that is going to change my life”.

I couldn’t focus on getting things done in my current mood.. My password reminded me that I shouldn’t let myself be a victim of my recent breakup and that I was strong enough to do something about it.

I made my password – Forgive@her. I had to type this password several times every day, each time my computer would lock. Each time I came back from lunch I wrote forgive her.
The simple action changed the way I looked at my ex-wife.. That constant reminder of reconciliation led me to accept the way things happened and helped me deal with my depression..
By the time the server prompted me to change my password following month, I felt free.

The next time I had to change my password I thought about the next thing that I had to get done. My password became Quit@smoking4ever .
It motivated me to follow my goal and I was able to quit smoking.

One month later, my password became Save4trip@europe, and in three months I was able to visit Europe.

Reminders helped me materialize my goals and kept me motivated and excited.
. it's sometimes difficult to come up with your next goal

keeping at it brings great results.

After a few months my password was -
lifeis#beauTful !!!

Life is going to change again 👌👌

Friday, 15 April 2016

02:36 0 Comments

मॉल मधली विझिट.
शनिवार- रविवारचं कंपल्सरी आउटिंग.
विंडो शॉपिंग करताना
मी एकेक वस्तू
बघते, निरखते, न्याहाळते, हाताळते..
आणि हे सगळंच 'रीच'च्या बाहेर आहे;
असं मनाला समजावून
प्राईस टॅग पाहून ठेऊन देते रॅकवर परत
जागच्या जागी..जसंच्या तसं..जिथे होतं तिथे..
खरं सांगू,
हल्ली फक्त तेव्हाच तुझी आठवण येते !
असंच नव्हतं का केलंस तू?
विंडो शॉपिंग केल्यासारखं
मला बघून, निरखून, न्याहाळून, हाताळून
मी रीचच्या बाहेरच आहे
हे परस्पर ठरवून
ठेऊन दिलंस रॅकवर परत !
जागच्या जागी..जसंच्या तसं..जिथे होते तिथे..
प्राईस टॅग तुला हवा तेव्हा काढलास
पुरे झालं, तसा परत लावलास..

खरंच सांगते,
हल्ली फक्त विंडो शॉपिंग करतानाच
तुझी आठवण येते!
गळ्यातला प्राईस टॅग
फक्त तेव्हाच काचत राहतो..!!
- स्पृहा.

Tuesday, 12 April 2016

09:28 0 Comments

आयुष्यातील यशाचे खरे गमक
*********************
100 लोकांचा एक समूह एका वक्त्याचे "आयुष्य "या विषयावर व्याख्यान ऐकत होता. त्या वक्त्याने प्रत्येकाकडे एक फुगा दिला आणि त्यावर आपले नाव लिहायला सांगितले. प्रत्येकाने नाव लिहिल्यावर त्यांनी तो फुगा हवेत सोडून द्या असे सांगितले. संपूर्ण hall रंगीबेरंगी फुग्यांनी भरून गेला. आता वक्त्याने सांगितले कि आता स्वतःचे नाव लिहिलेला फुगा शोध आणि हातात धरून ठेवा...
इतक्या फुग्यातुन स्वतःचे नाव असलेला फुगा शोधायला सगळ्यांचीच तारांबळ उडाली ...खूप वेळ झाला तरी प्रत्येकाला आपला नाव लिहिलेला फुगा काही मिळेना. ते पाहून वक्त्याने सांगितले कि आता तुमच्या डोळ्यासमोर हाती जो फुगा लागेल तो घ्या आणि त्यावर ज्याचे नाव असेल त्यास तो द्या. पुढील २ मिनिटात सर्व फुगे ज्याचे होते त्यास मिळाले ...
वक्ता बोलू लागला.....
आपल्या आयुष्याचेही असेच आहे ..प्रत्येक जण सुख ,समाधान आनंद शोधत आहे ..पण खरा आनंद, सुख कुठे आहे हे कळतच नाही आहे....खरा आनंद हा दुसर्यास आनंद ,
सुख, समाधान देण्यात दडलेला आहे...इतरांना त्यांचा आनंद द्या ..तुम्हाला आनंद, समाधान नक्कीच मिळेल ..आयुष्यातील यशाचे खरे गमक ह्यातच आहे....
@ Dhanajay deshpande

02:16 0 Comments

जगातील सगळ्यात सुंदर भावना म्हणजे प्रेम आणि त्या प्रेमाचा उगम ज्या मनातून होत ते कधीच वाईट , दुसर्याच अहित करणार असू शकत नाही. जग खूप वाईट झाल आहे अस म्हणताना आपण आपल्या कठीण काळात आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी प्रेमाची माणस सहज विसरतो. प्रेम , आपुलकी ह्या भावना आयुष्याचा एक भक्कम आधार असतात. प्रेम व्यक्तीला खूप छान बनवत. आयुष्यातील सगळ्या नकारात्मक गोष्टीना दूर सारण्याच सामर्थ्य जर कशात असेल तर ते फक्त आणि फक्त प्रेमात आहे. तुम्ही कुणासाठी तरी जगता, त्याच्यासाठी आयुष्य वेचता , अनेकदा त्यांच्यापासून दुरावल्यावर सगळ्या मोहांना दूर करून कधी कधी आयुष्यभर एकट राहण्याचाही निर्णय घेता कारण तुम्हाला पर्याय निवडायचे नसतात. तुमच प्रेम तुम्हाला एक आत्मिक शक्ती देत. दुसरा कसा वागला , त्याने प्रेमात काय दिल ह्यापेक्षा आपण आपल्या भावनांचा सन्मान करावा, स्वतःशी प्रामाणिक रहाव. तुम्ही जेव्हा आपल्या व्यक्तीसाठी काहीतरी करता तेव्हा त्यामागे अहंकार नसतो , मोठेपणा नसतो तर असते ती फक्त काळजी , आत्मीयता. काही लोक त्याग करतानाही दुसर्या व्यक्तीला अपराधेपणाची भावना देतात त्याला काहीच अर्थ नसतो. त्याग हा प्रेमातून आला पाहिजे अपराधेपणाच्या भावनेतून नाही...  भावनांशी प्रामाणिक राहून घेतलेला निर्णय हा नेहमी खरा असतो. दुसर्याला शिक्षा देण्याची वृत्ती प्रेमात कधीच नसते. अगदी हवी ती सोबत मिळाली नाही म्हणून आयुष्य एकट्याने काढतानाही त्या व्यक्तीला आपण दूषण देत नाही. त्याने त्याच्या मार्गे सुखाने जाव पण त्याच मळलेल्या वाटेचे आपण वाटसरू व्हाव ही त्याची अपेक्षा आपल्यावर अन्याय करणारी असते अस मला वाटत. खूप वेळा स्वतःच्या मनातील अपराधेपणा दूर व्हावा ह्यासाठी दुसर्या व्यक्तीवर तू देखील  कुणाची तरी सोबत घेऊन तुझा प्रवास सुरु कर अस आपण सहज सांगतो पण प्रेम म्हणजे व्यवहार नाही. जर पर्याय शोधायचेच असते तर त्या व्यक्तीने प्रेमात असतानाच तो शोधले असते हे साध गणित असत. प्रेम हे अशा देवाण घेवाणीवर चालत नाही. अनेकदा आपण त्यांच्या सुखासाठी केलेल्या गोष्टी चुकीच्या अर्थाने घेतल्या जातात आणि आपण गुन्हेगार ठरतो. खर तर प्रेमात खोटेपणा , सत्य लपवण ह्या गोष्टीच व्यक्तीला अधिक विरक्त करतात कारण त्यांचा नात्यावरचा , प्रेमावरचा विश्वास उडतो आणि ते कुणाचीतरी सोबत घेण्यापेक्षा एकट रहाण्याचा निर्णय घेतात. प्रेम ही एक विशुद्ध भावना आहे. त्या भावनेत खोटेपणा , दूषण , तिरस्कार , कडवटपणा ह्या गोष्टीला काहीच स्थान नाही आणि त्यामुळेच जेव्हा ह्यातील एका जरी गोष्टीचा शिरकाव नात्यात झाला की ते प्रेम कोमेजून जात. प्रेम जर मनाच्या संमतीने होत तर ते जपण्याची जबाबदारी सुद्धा मनाचीच आहे. त्या जबाबदारीची जाणीव ओझ होऊ लागली की समजून जाव प्रेम अखेरचा श्वास घेत आहे. दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांना दूषण देऊन जगू लागतात तेव्हा खर्या अर्थाने प्रेम ओशाळून जात , पराभूत होत आणि  एकाकी होऊन जात हेच खर आहे  ............. मिनल सबनीस

02:15 0 Comments

" मिनल खर सांग प्रेम म्हणजे नक्की काय असत ? सगळे त्या विषयी बोलतात लिहितात पण खर प्रेम कुणी कुणावर करत का ग ? तुझा विश्वास आहे का प्रेमावर ?" हर्षदाचे ३ प्रश्न एकदम आले तेव्हा काही वेळ मी देखील साशंक झाले. कारण प्रेमाची खरी व्याख्या आजवर प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनातून केली आहे पण खरच खर प्रेम कुणी आजवर कुणावर केल आहे का ? थोड्याशा बेबनावाने , दोष सापडले म्हणून तोडून पुढे जाणारे , इतर पर्याय शोधणारेच अधिक सापडतात. तुम्ही एखाद्या नात्याला सर्वस्व देऊनही ते प्रेम तुमच्याशीच कमिटेड राहील अस तुम्ही विश्वासाने सांगू देखील शकत नाही. तुमच्याप्रती एकदा दृष्टीकोन बदलला तर तुमच्या चांगल्या दृष्टीकोनातून केलेल्या गोष्टींवर देखील गैरसमजुतींच मळभ पसरू लागत. तुमच्याप्रती सावधगिरी बाळगली जाते, अविश्वास दाखवला जातो. कधी काळी प्रिय असणारे गुण कालांतराने दोषात परिवर्तित होताना दिसतात. नात्यांचे असे ठिसूळ पाय प्रेमासारख्या गोष्टीला पेलू शकतात का ? खूप वेळा आपला प्रेमाचा प्रवास हा एकांगीच असतो.आपण ज्या समरसतेने नात्यांकडे, प्रेमासारख्या भावनेकडे बघतो त्याच्या अगदी विरुद्ध विचाराने समोरची व्यक्ती चालत असते. माझा एक फ्रेंड नेहमी मला म्हणतो " तू सगळ्यांना स्वतःच्या दृष्टीकोनातून बघत असते पण कधी तरी ते जस आहे तस बघण्याचा प्रयत्न कर म्हणजे तुला दुखः कमी होईल " त्याच म्हणण पटल तरी प्रेम म्हणजे एक भावनिक जबाबदारी असते अस मला नेहमी वाटत. प्रेमाच ओझ होता कामा नये. प्रेम हे नेहमीच आयुष्याला एक छान वळण देणार असत. एखाद्या चुकीने ते गुन्हेगार ठरू शकत नाही.आपण सगळेच काही तात्कालिक गोष्टींसाठी नेहमीच प्रेमाच्या लोकांना वेठीस धरत जातो मग त्यांचा दोष असो वा नसो. आपण काय सहन केल किवा करत आहोत ह्या विचारात दुसर्या व्यक्तीच्या वेदनांची आपल्याला जाणीव देखील होत नाही. आपण वार करतो आणि दुसर्या सोबत स्वतःलाही घायाळ करून घेतो. कालांतराने जेव्हा कुणी बदलत तेव्हा त्या व्यक्तीविषयी मी वाईट विचार करूच शकत नाही हा माझा दोष आहे कारण मी त्याने दिलेल्या आनंदाच्या , समाधानाच्या आठवणीना खर मानते. एका गोष्टीच दुखः नक्कीच वाटत की कधी काळी चांगले असणारे आपण अचानक जेव्हा वाईट ठरतो तेव्हा आपला चांगुलपणा सहज विसरला जातो आणि आपण गुन्हेगार असल्यासारखी वागणूक मिळते. आपण सावरण्याचा प्रयत्न करतो तर अधिकाधिक आपल्याला अविश्वासाच्या गर्केत लोटलं जात. प्रेम कधीच कुणाच नुकसान करत नाही पण अशा प्रेमाची किंमतही शून्य असते हे कटू सत्य आहे..आपण पूर्वी जसे असतो तसेच राहतो पण परिस्थिती आणि वेळ दोन्ही गोष्टी बदलल्या जातातपण नेहमी त्या नकारात्मकच का बदलतात हे देखील कोड आहे. कुणीच कुणाला आयुष्यभर सोबत करत नाही आणि करू शकतही नाही पण जे काही अनमोल क्षण कुणाच्या सोबत तुम्हाला मिळतात त्या क्षणांमध्ये त्या व्यक्तीला चांगल्या आठवणी आपण नक्कीच देऊ शकतो. शेवटी प्रेम म्हणजे तरी काय असत तुम्ही दूर गेल्यावर त्या व्यक्तीला हुरहूर वाटण , त्या व्यक्तीवर अन्याय होणार नाही ह्याची काळजी घेण , त्याच्या सुख दुखात त्याला समर्थ साथ देण आणि जेव्हा निरोपाची वेळ येते तेव्हा त्याच्यासाठी खूप सार्या शुभेच्छा मागे ठेवून जाण.. प्रेम हे असच असत निरागस तिथे व्यवहार नसतो , सावधानता नसते. नदी सागराला मिळून जशी स्वतःच अस्तित्व विसरते आणि जसा सागर नदीला ती कशीही असली तरी सामावून घेतो तेच समर्पण म्हणजे खर प्रेम नाही का ?......... मिनल सबनीस