"जीवनाकडे मोठ्या दृष्टीकोनातून पहा!
असे खूप लोक आहेत जे तुमच्यापेक्षा चांगले आहेत आणि असे करोडो लोक आहेत जे येतील आणि तुमच्यापेक्षा चांगले होतील. मग तुम्ही काय करणार?
तुम्ही तुलना कशासाठी करता?
देव सर्वांवर प्रेम करतो आणि तो तुमच्यावरदेखील प्रेम करतो; हे लक्षात ठेवा.
प्रत्येकाची जगण्याची स्वतःची अशी शैली असते आणि स्वतःचा असा विश्वास असतो. तुम्हाला जे मिळाले पाहिजे ते तुम्हाला मिळेलच.
तुम्ही बुद्धिमान असाल, तरच तुम्ही यशस्वी व्हाल असा काही नियम नाही. ते अशा पद्धतीने घडत नसते. तुम्ही जर सभोवताली पहिले तर तुम्हाला दिसेल की, एखादी व्यक्ती, ज्याची सामान्य कारकुनी करण्याचीदेखील पात्रता नाही, ती करोडपती बनली आहे. म्हणजे नशीब नावाचे काही खरोखरच आहे आणि हे नशीब तुम्हाला तुमच्या मार्गावर नक्कीच भेटेल. हे सत्य मान्य करा आणि स्वतःची दुस-याबरोबर तुलना करणे बंद करा. तुम्ही चांगले आहात हे लक्षात घ्या. तुमचे हृदय जर निर्मळ असेल तर तुम्ही प्रेमळ असता आणि तुम्ही प्रेमळ असाल तर सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतात."
Tuesday, 5 February 2013
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment