Follow Us @soratemplates

Monday, 1 July 2013

बडा शायर...

तो...बसलाय ना तिथे...  वरती...
बहोत  बडा शायर है बेटा... 
कागज घेतो.. शायरी लिहीतो.. आणि देऊन टाकतो...
ये लो.. जिंदगी... आयुष्य

मग आपण ते काव्य जगायचं... संपेपर्यंत...

काव्य त्याचं.. आपण आपापल्या ढंगाने पेश करायचं...
इतरांनी पेश केलेलं पहायचं... 
आणि दाद द्यायची त्याला.... क्या बात है...

सचमुछ.. बहोत बडा शायर है वो...

कधी दोन शब्द लिहून... अर्धवट ओळ लिहून ...
सोडून देतो कविता...
पान फाडून टाकलं तर सुट्का तरी होते...
काही पानं तशीच ठेवतो... कधीतरी पूरी होतील म्हणून..
कभी चार मिसरोंकि एक छोटी सी कताअत.. चारोळी सारखी...
पण असा काही अर्थ भरतो ...  की...   मुकर्रर !!
आणि कधी उगाच .. बेवजह.. बेमानी नज्म.. अर्थशून्य...दीर्घकाव्य.. खंडकाव्य... लिहीत जातो.. लिहीत जातो...
मग लोक वाट बघतात... हे केव्हा संपतय ...

क्या कहे... बहोत बडा शायर है वो...

कधी मस्त मूड जमला ना त्याचा ... कि मग आमच्या सारखी एक गजल लिहुन काढतो... 
क्षणांचे शब्द बनवतो... प्रसंगांचे मिसरे जोडतो...
एक खुबसुरत गजल.. मगर गैरमुसलसल... प्रत्येक शेर वेगळ्या विषयावर..
कधी वैचारिक.. कधी श्रुन्गारिक.. कधी सामाजिक..
पण आपण जगायचं... प्रत्येक शेर.. आपल्या कुवतिनुसार..
कोणि स्वतःशिच गुणगुणतो... कोणि दोस्तोयारांमध्ये ऐकवतो..
कोणि महफ़िलीत पेश करतो.. आणि एखादा.. सुरांचा साज चढ्वून अमर करतो....
सब लिखने वाले का कमाल है...
बहोत बडा शायर है वो... कमाल कि शायरी लिखता है...

सिर्फ़ एक बात है बेटा...
वो लफ़्जों के मानि नही देता...
त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपणच शोधायचा असतो... आपणच शोधायचा असतो..

                                                                                               --- समीर

No comments:

Post a Comment