Follow Us @soratemplates

Monday, 29 July 2013

नवा गडी अन् राज्य नव....TimePlease

नात्यांच्या बंधात रेशमी, खेळ मनाचा रंगे 
डाव नवा आकारा येई, नव्या भिडूच्या संगे …
जुळता हृदयीचे सूर उमगते ,मग आनंदाची ठेव ,
स्वप्नांच्या आकाशी,प्रीतीचे इंद्रधनु उमलाव ...लाला
नवा गडी अन् राज्य नव \\धृ\\

कुणीतरी बघता बघता घेई मनाचा ठाव
मनातल्या सार्या स्वप्नांचा जिथून दिसे गाव 
सार्याच क्षणांवरी कुणीतरी जणू मोरपीस फिरवावं
शब्दांच सार गूढ जरी एका नजरेतूनच कळावं...लाला\\१\\
नवा गडी अन् राज्य नव

क्षणांत सारी वाट गवसते हाती येता हात
नव्या नव्या या  वळणांवरती हवी हवीशी साथ ...2
मग पाखरांचे हे थवे जाती क्षितिजाच्या पायी
हलके हलके हे सुखाच जणू  चांदण पसरावं.....लाला \\2\\
नात्यांच्या बंधात रेशमी, खेळ मनाचा रंगे 
डाव नवा आकारा येई, नव्या भिडूच्या संगे …
नवा गडी अन् राज्य नव



No comments:

Post a Comment