Follow Us @soratemplates

Monday, 11 April 2016

" मी नेहमी बघतो हा तुझ तिच्याशी बोलण खूप वेगळ असत. शब्द जरी नॉर्मल असले तरी चेहरा , डोळे वेगळीच चमक असते. बाकी कुणाशी नाही तो इतका छान बोलत तू ....? काहीतरी गडबड आहे " जयेश हसतच सागरची खेचत होता. सागर देखील मनापासून हसला आणि म्हणाला " मित्रा अस काही नाही आहे. काही लोक बघता क्षणी आवडतात तर काही सहवासाने... रुचीला पहाता क्षणी मला तिच्यात एक छान मैत्रीण मिळाली. मस्त रापोर्ट बनत गेला. आमची निखळ मैत्री आहे आणि जरी मैत्रीपेक्षा अधिक काही असल तरी ते टिपिकल प्रेम नक्कीच नाही. उगाच लेबल नको लावूस प्लीज "... सागर म्हणत होता ते अगदी खर होत. तुमचे सूर ठराविक लोकांशीच का जुळतात , बघता क्षणीच एखादी व्यक्ती तुम्हाला जवळची का वाटते ह्याच उत्तर अनेकवेळा आपल्याकडे नसत.समान गुणधर्म असलेली मंडळी एकत्रित येतात अस म्हणाव तर अनेकदा विसंगत गुणधर्माच्या माणसाचं एकमेकांशी उत्तम पटताना आपण बघतो. सहवासाने , एकमेकांना भेटून ही आपुलकी निर्माण होते अस समजाव तर फेसबुक सारख्या सोशल साईट वरती तुम्हाला प्रत्यक्षात कधीच न भेटलेली व्यक्ती देखील आपलीशी वाटते. " दूरस्थ नाती टिकत नाहीत " असा विचार मांडणार्या व्यक्तीलाही स्वतःचे शब्द मागे घ्यावे लागतील असे ऋणानुबंध आपण इथे जुळताना बघितले आहेत. कधी कधी आपल्यालाही आश्चर्य वाटत आणि प्रश्न पडतो की " हीच व्यक्ती का ? " विचार करतो आणि ओठावर एक छानस हसू येत. काही लोक तुमच आयुष्य खूप सकारात्मक पद्धतीने प्रभावित करतात. त्यांना बघितल्यावरच तुम्हाला एक आशा , उत्साह मिळतो. कधी ते तुमचा आदर्श होतात तर कधी मैत्रीच नात निर्माण होत तर कधी आपण त्यांच्या अगदी प्रेमातही पडतो. तुमच्या सोबत अनेक असतात पण तुम्ही मात्र एखाद्या व्यक्तीच्याच सोबत रहाण पसंत करता...त्यांच्या सहवासात तुम्हाला एक युनिक भावनिक आणि मानसिक आपलेपणा जाणवतो.कदाचित जी बंधन आत्मिक असतात ती स्वाभाविक लक्षात रहातात, जपली जातात. त्यांना विसरण किवा तोडण ह्या दोन्ही गोष्टी घडत नाहीत. ज्यांच आपल्या लेखी काही महत्व नाही त्यांनी दुखावल्यावर आपला अहंकार दुखावतो तर जे मनाने जवळ असतात त्यांनी दुखावल्यावर, ते दुरावल्यावर मात्र आपला आत्मा , मन दुखावलं जात, आपण एकाकी होतो.... काही नात्यांना "नाव" नसत , "कारण" नसत, साचेबद्ध व्याख्येत त्यांना बसवताही येत नाही तरी ती नाती स्पंदनासारखी हृदयाच्या जवळ रहातात ती कायमची ..... मिनल सबनीस

No comments:

Post a Comment