विसरुन जा मला ,
माझ्या सार्या क्षणांना , सार्या आठवणींना
भेटू नकोस पुन्हा कधी...
कधी सादही देऊ नकोस
जे झालं ते एक स्वप्न समज फक्त
जे खूप सुंदर असलं तरी जास्त दिवस आठवणीत नसतं तसंच
हे बोलणं तुझ्यासाठीही काही सोप नव्हतं
ना मला ते अनपेक्षितपणे ऐकणं
तु तर गेलास बोलुण कधी नाही तितक्या सहजपणे कारण मी आजवर फक्त अबोलाच पाहिला होता तुझ्या अबोल ओठांवर
पण
आता असं वाटतंय
तुझा अबोलाच बरा होता
निदान त्यातुन मी माझ्या मनासारखे अर्थ लावु शकत होते
जीव तर जळत होता तेव्हाही पण आज तुझ्या नाजुक ओठ्यातल्या शब्दांनी घायाळ केलंय
तुझ्या त्या लुकलुकणार्या चांदण्यांसारख्या लवणार्या पापण्या
आज स्तब्ध असल्या तरी माझा जीव खूप वरखाली होतोय
तुझा विरह जगलाय मी
तुझ्याविना तुझ्या आठवणींसोबत
पण
आता तुझ्याविना जगणं खूप अवघड होऊन बसलंय
आणि तुझ्या शब्दांनी आज सर्वच हरवलंय माझं
पण विसरुन जाईल या तुझ्या शब्दांनाच एक स्वप्न समजुन
कारण तुला विसरणं शक्य नाही...
कधिच शक्य नाही
#तुझ्याविना
#अबोल_प्रीत

No comments:
Post a Comment