Follow Us @soratemplates

Saturday, 10 August 2013

तू , मी आणि पाऊस....

तू , मी आणि पाऊस....
कसलं विलक्षण नातं होतं ना आपलं...
तू जवळ असताना तो मृदगंध घेऊन यायचा...
तू दूर गेलीस की तो काळ्या मेघांआड लपून राहायचा..

बरसत्या सरी आणि थंडगार वारा...
अजूनही जाणवतोय तुझा उष्ण स्पर्श...
 अचानक कडाडली वीज आणि तू मला बिलगलीस...
तेव्हा तुझ्या नकळत... पावसाचे आभार मानले मी....

आठवत आहेत तुला ती "माझी-तुझी" भांडणं...
आपली कडकड कमी म्हणून कदाचित पावसाचं कोसळणं...
रुसणं फुगणं आणि तुझं पावसात जाऊन भिजणं...
आणि एकाएकी पावसाचं काढता पाय घेणं....

तू जशी गेलीस...
तेव्हापासून सारा पाऊस डोळ्यांमध्ये राहायला आला...
एकदा पाऊस शहाण्या मित्र सारखा म्हणाला..
"नाही शोभत तुला सालं असा रडताना.."
 असं म्हणून.. स्वतः मात्र बेधुंद होऊन बरसला...

No comments:

Post a Comment