तुझ्याशिवाय जगतांना ..
तुझ्याशिवाय जगतांना माझं हे असं होतं ..
दिवस सरतो कसाबसा .. जगण्या-मरण्याचा पसारा आवरतांना ..
पण सांज ढळून अंधार पडायला लागला की माझं मन पुन्हा तुझ्या आठवणींत वेडंपिसं होतं ..
दिवसही कुठे नीट सरतो म्हणा .. तुझ्याच आठवात हरवून असतो सदा ..
माझ्या ह्या 'वेंधळेपणाचं' मग साऱ्या 'हुशार' माणसांत नेहमीच 'हसं' होतं ..
तुझ्याशिवाय जगतांना माझं हे असं होतं ..
गर्दीत एकदा माझा हाथ सुटल्यावर जशी बिथरली होतीस तू ..
आज गर्दीत 'एकटं' फिरतांना तू आठवलीस की माझ्याही मनाचं अगदी तसंच होतं ..
तुझ्याशिवाय जगतांना माझं हे असं होतं ..
हसावं म्हटलं तर कारण सापडत नाही ..
रडावं म्हटलं तर अश्रू साथ देत नाही ..
'जगावं' म्हटलं तर 'अर्थ' सापडत नाही ..
अन लिहावं म्हटलं तर शब्द साथ देत नाहीत ..
सहनं अशक्य होतं .. जगणं नकोसं होतं ..
'नियतीला खेळायला आवडतं ..'
अन तू सोबत नसलीस की माझ्या मनाचं हे असं 'खेळणं' होतं ..
तुझ्याशिवाय जगतांना माझं हे असं होतं !!!!

No comments:
Post a Comment