बरसली सर पावसाची... अन बदलला आज ऋतू ...
एकीकडे तहानलेला मी... अन दुसरीकडे चिंब भिजलेली तु ...
कोसळली वीज कडाडून... जणू हेरला त्या आभाळाने माझा हेतू ...
एकीकडे शहारलेला मी... अन दुसरीकडे दचकून मला बिलगलेली तु ...
तृप्त झाली धरती .. अन वेलींना नवी पालवी लागली फुटू ...
एकीकडे तुझ्या ओलसर केसांत हरवलेला मी .. अन दुसरीकडे माझ्या कुशीत हळूच विसावलेली तु ...
पाहुनिया तुला मिठीत माझ्या .. ते आभाळही लागलं काहीसं जळू ..
एकीकडे तुझ्या नजरेच्या खोलीत बुडालेलो मी .. अन दुसरीकडे तुझ्या स्पर्शाने मला सावरणारी तु ...
'जगण्याला' आणखीन काय पाहिजे …
एकीकडे श्वास घेणारा मी .. अन दुसरीकडे मला ते 'घ्यायला लावणारी' तू ..
एकीकडे 'अपूर्ण' राहिलेलो मी .. अन दुसरीकडे मला 'पूर्ण' करणारी तू !!!


No comments:
Post a Comment