Follow Us @soratemplates

Friday, 2 August 2013

दैवत

पहिले शब्द ज्यांनी लिहिले, 
माझ्या मनाच्या कोऱ्या पाटीवर । 
शाबासकीची थाप मारीली, 
प्रथम त्यांनीच माझ्या पाठीवर ।। 
पडू दिली नाही कमतरता, 
मला कोणत्याच गोष्टीची । 
मी हरलो म्हणून रडताना, 
स्वप्ने त्यांनीच दाविली मला जिंकण्याची ।। 
ज्यांनी मला दिली, 
अमूल्य संस्कारांची शिदोरी । 
जी मला देणार आहे, 
संपूर्ण आयुष्यभर उभारी ।। 
ज्यांना मी मानले, 
माझ्या जीवनात आदर्श । 
लाभला त्यांचा मला, 
स्नेहमयी स्पर्श ।। 
अशा माझ्या अतिशय प्रिय, 
देवरूपी माता-पित्यांवरी । 
मनापासून प्रेम राहो, 
हीच इच्छा खरी ।।
- सारंग गजानन कुलकर्णी, नाशिक.

No comments:

Post a Comment